तेलाचे दर घसरले
by
sahyadrilive
September 29, 2022 1:22 PM
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राज्यात तेलाच्या किंमतीत २० ते २५ टक्के घसरण झाली आहे. शेंगदाना तेल १८०रू., सोयाबिन तेल १३३रू., तर खाद्यतेल १६०रू प्रतिलिटर असा भाव सध्या बाजारात पहायला मिळत आहे.
तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे लोकाच्या दैनंदिन वापरात महत्वाचे असलेले तेल खरेदी करणे सामान्य जनतेसाठी अवघड झाले होते. सणांच्या तोंडावर तेलाच्या किंमती उतरल्यामुळे वाढत्या महागाईत नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा दसरा, दिवाळी आनंदमय होईल असे दिसत आहे.