विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती; प्रसाद लाड समितीचे प्रमुख
by
sahyadrilive
April 7, 2023 12:40 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांची या समितीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सुरेश धस, गोपीचंद पडळकर, ॲड. अनिल परब, विलास पोतनीस अब्दुल्लाह खान दुर्राणी, शशिकांत शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, अभिजित वंजारी, कपिल पाटील हे या समितीचे सदस्य असणार आहेत.
अशी माहीती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी दिली आहे.