राज्यातही पशुखाद्य उत्पादन आणि विक्रीसाठी नवीन नियमावली
राज्यातही आयएसआय मार्क उत्पादन व विक्री
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । पशुखाद्य हे पशुपालन आणि दुग्धोत्पादन व्यवसायासाठी अतिशय महत्वपुर्ण घटक आहे. जनावरांचे आरोग्य पशुखाद्याच्या दर्जावर ब-याच अंशी अवलंबून असते. परंतू मानवी खाद्यपदार्थांप्रमाणे पशुखाद्य उत्पादनाच्या नियमांकडे जास्त लक्ष दिले जात नाही. याच पार्श्वभुमीवर पशुखाद्याची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये शिफारशीत मानकानुसारच पशुखाद्याचा दर्जा राखण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत.
फूड्स सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड्स ऑफ इंडिया या संस्थेने त्यांच्या १७ डिसेंबर २०१९ तसेच २७ जानेवारी २०२० च्या पत्रातील निर्देशाप्रमाणे पशुखाद्याचे उत्पादन व विक्री याकरिता आयएसआय मार्क असणे बंधणकारक केले आहे. त्यानुसार राज्यातही आता आयएसआय मार्क उत्पादन व विक्री होणार आहे.
काय आहे नियमावली?
नव्या नियमावलीनुसार, पशुखाद्याच्या बॅगवर त्यातील घटकांची माहिती नोंदवणे सक्तीचे असणार आहे. त्यामध्ये क्रूड प्रोटीन, क्रूड फायबर, क्रूड फॅट, कॅल्शिअम, फॉस्फरस, ऍश इ. घटकांचा समावेश आहे. त्याचबरोबर अन्नघटकांच्या प्रमाणकांसोबत पॅकिंग बॅगवर उत्पादन संस्थेचे नाव, परवाना क्रमांक, पशुखाद्य उत्पादन तारीख, उत्पादन वापरण्याचा अंतिम दिनांक, बॅच क्रमांक, निव्वळ वजन, विपणन कंपनीचे नाव व पत्ता ही सगळी माहिती असणे बंधनकारक असणार आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES