कोहिंडे बूद्रुकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जयंती व पुण्यतिथी निमित्त महापुरूषांना अभिवादन
कोहिंडे बुद्रुक ( ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्यभर मंगळवारी (दि.१) उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. कोहिंडे बूद्रुक (ता. खेड) गावच्या न्यू इंग्लिश स्कूल कोहिंडे बूद्रुक विद्यालयातही या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत या महापुरूषांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते रोहिदास रणपिसे व उद्योजक प्रमोद कुटे यांनी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा शाळेला भेट दिल्या. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या शुभ हस्ते प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. दोन्ही महापुरूषांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी यासाठी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे जीवन व कार्य परिचय या विषयावर विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यालयातील भारत भूषण पुरस्कार प्राप्त शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडा गायन केले. या प्रसंगी वृक्षारोपणाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES