युपीचे ‘नेताजी’ काळाच्या पडद्याआड
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचं निधन
उत्तर प्रदेश । सह्याद्री लाइव्ह । उत्तर प्रदेशच्या राजकिय वर्तुळात ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध असलेले समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यांचे निधन झाले. सोमवारी सकाळी गुरूग्राम येथिल मेदांता रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे वय ८२ वर्ष होते.
मुलायमसिंह यांना श्वसनाचा आणि रक्तदाबाचा त्रास होता. २२ ऑगष्टपासून ते रूग्णालयात उपचार घेत होते. २ ऑक्टोबरच्या दूपारी अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना ICU मध्ये हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज अखेर त्यांचा मृत्यु झाला.
भारताचे संरक्षणमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अशा अनेक महत्वाच्या जबाबदा-या पार पाडणारे मुलायमसिंह ५५ वर्ष राजकारणात सक्रिय होते. ८ वेळा आमदार तर ७ वेळा खासदार अशी त्यांची राजकिय कारकिर्द होती. त्यांच्या मृत्युमुळे देशभरात शोककळा पसरली आहे.