महिला केंद्रीत विकासावर भर देण्याची गरज – पंतप्रधान नरेंद्र मोदी
बाली । सह्याद्री लाइव्ह । सध्या बालीमध्ये जी-२० ही आंतरराष्ट्रीय परिषद सुरु आहे. वीस देशांच्या या परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी महिला केंद्रीत विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.
अध्यक्षीय भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “वैश्विक विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे जी-२० अजेंडामध्ये आपण महिला केंद्रीत विकासावर भर द्यायला हवा. यासोबतच शांतता आणि सुरक्षाही प्रदान करायला हवी. कारण त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञानाचे फायदे घेता येणार नाही. यासाठी जी-२० मध्ये काम करायला हवं.”
वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर या तत्वाने भारत काम करत आहे आणि करेल. जी-२० परिषदेचं अध्यक्षपद भूषवणं हे भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी हा विश्वास देतो की भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जी-२० ची बैठक होईल. जेणेकरून सर्व देशांना भारतातल्या विविधतेची ओळख होईल आणि सगळ्यांनाच लोकशाहीची जननी मानल्या जाणाऱ्या भारताला समजून घेता येईल.”