राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या वतीने अरूण चांभारे, लता गोपाळे यांचा सत्कार
by
sahyadrilive
March 25, 2022 4:23 PM
खेड : राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या वतीने पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे नवर्निवाचित संचालक अरुण चांभारे, लता गोपाळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष अॅड. दिलीप करंडे, खेड तालुका अध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, आखरवाडी गावच्या सरपंच मोनिका मुळूक, ज्येष्ठ विधिज्ञ संभाजी मिंडे, शंकर कोबल, संजय गोपाळे, राजेंद्र कुलकर्णी, संदीप घुले, मिलिंद रोडे, प्रशांत राक्षे, शरद नवले, रोहिदास (महाराज) मांजरे, विकास टाकळकर, दिगंबर मुळूक आदी मान्यवर उपस्थित होते.
अरुण चांभारे, लता गोपाळे यांनी कात्रज दूध संघाच्या निवडणुकीतील विजयाचे श्रेय आमदार दिलीप मोहिते पाटील यांना दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अतुल ऊर्फ प्रदीप गोरडे यांनी केले. ॲड. दीपक चौधरी यांनी आभार मानले.