एमआयटी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्गत राष्ट्रीय सेवा योजना दिन विविध उपक्रमांनी साजरा
आळंदी। सह्याद्री लाइव्ह। राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना मध्ये पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने महाविद्यालयातील ८५ विध्यार्थाने वृक्षाचे एकमेकांना आदण प्रदान केले ते वृक्ष प्रत्येक विध्यार्थाने स्वतःच्या घरी किंवा सोसायटी मध्ये लावून त्याचे संवर्धन करून त्याच्या वाढीचे अपडेट दार तीन महिन्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाला फोटोच्या माध्यमातून गुगल ड्राईव्ह वर अपलोड करावयाचे आहेत. या माध्यमातून वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाविषयी जागृति करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी मशाल पेटवून कार्यक्रमाला सुरवात केली. महाविद्यालयाच्या आवारात वृक्षदिंडी वृक्षप्रदक्षीणा घालण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागातील आजी माजी स्वयसेवकांनी पथनाट्य विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाविषयी माहिती सर्व विध्यार्थाना दिली. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना चे अधिकारी प्रा. अरविंद वागस्कर राष्ट्रीय सेवा योजना विभागातिला सदस्यानि केले. उपप्राचार्य डॉ. मानसी अतीतकर, उपप्राचार्य प्रा. अक्षदा कुलकर्णी, कुलसचिव संदीप रोहिनकर सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांरी उपस्थिती होते.