नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘फडतूस’ असा उल्लेख करत त्यांच्यावर टिका केली होती. यावरून भाजप नेते आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरेंच्या टिकेला नारायण राणेंनी ‘महाफडतूस’ म्हणत उत्तर दिले. तसेच, २०१९ साली मीच देवेंद्र फडणवीसांना युती न करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा नारायण राणेंनी यावेळी केला.
राणे म्हणाले, “पाच वर्षं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षनेता होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते. भाजपानं २०१४ साली जर उद्धव ठाकरेंना आधार दिला नसता, युती झाली नसती तर त्यांचे आमदार काही निवडून आले नसते. ते सत्तेत आले नसते. २०१९लाही मी देवेंद्र फडणवीसांना सांगत होतो की युती करू नका. सगळं संपलंय त्यांचं. काही कामाचं नाही”, असं नारायण राणे म्हणाले.