मंगळवार पेठेतील तक्रारदार कुटुंबाची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट
by
sahyadrilive
January 24, 2022 2:53 PM
सातारा : सातारा येथील मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनी येथील लहान बाळ घेऊन जाण्याच्या अनुषंगाने तक्रार करणाऱ्या कुटुंबांची गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट घेऊन तक्रारीच्या अनुषंगाने माहिती घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यावेळी गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, तुम्ही केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस विभाग योग्य तो तपास करेल. कोणी दोषी असल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पोलीस विभागाला तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करुन तपास करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. तपासाअंती सत्य बाहेर येईल यातून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी तक्रारदार कुटुंबाला दिले.