दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे अभिवादन
by
sahyadrilive
January 9, 2022 11:09 AM
सातारा : मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते. या प्रसंगी गृह राज्यमंत्री देसाई यांनी पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.