मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट; आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी
पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. शासनाने आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबतची पाहणी त्यांनी केली.
यावेळी मंत्री भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्याने सदर रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. स्वस्त धान्य दुकानदार धनंजय दाभाडे प्रामाणिकपणे सेवा करत असल्याबद्दल कौतुक करत आपले असेच चांगल्या पद्धतीने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.यावेळी नायब तहसीलदार सरिता पाटील, पुरवठा निरीक्षक दीपक चव्हाण, मंडळ अधिकारी तसेच तलाठी उपस्थित होते.
या प्रशिक्षण केंद्रासाठी 12 वर्षांच्या आतील मुला-मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये प्रत्येकी 15 मुलं आणि मुलींचा समावेश आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बॅडमिंटन खेळामध्ये शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार विजेत्या विघ्नेश देवळेकर यांची प्रशिक्षण म्हणून निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या मुला-मुलींना मोफत प्रशिक्षण दादोजी कोंडदेव स्टेडिअम मधील बॅडमिंटन हॉलमध्ये सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही सत्रात हे प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर त्यांना मोफत किट देखील देण्यात आले आहे.