मिंडा लाईटिंग कंपनीच्या बाहेरून मोटारीची पळविली
महाळुंगे (चाकण) । सह्याद्री लाइव्ह । महाळुंगे येथील मिंडा लाइटिंग कंपनीच्या बाहेर पार्क केलेली मोटार अज्ञात चोरट्याने पळविली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला.
या प्रकरणी विक्रम दिलीप बोत्रे (वय ३०, रा. येलवाडी, संत तुकारामनगर, जुन्या टोल नाक्याजवळ, ता. खेड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम बोत्रे यांची मोटार त्यांचा ड्रायव्हर सिद्धेश्वर शहादेव माने याने ३१ ऑक्टोबरच्या रात्री साडेदहाच्या सुमारास मिंडा लाइटिंग कंपनीच्या बाहेर मोटार पार्क केली. आणि ते कंपनीत झोपण्यासाठी गेले. दुस-या दिवशी सकाळी आठच्या सुमारास कंपनीतून बाहेर आले. मात्र त्यांनी पार्क केलेल्या ठिकाणी मोटार दिसली नाही. त्यांची मोटार अज्ञात चोरट्याने पळवून नेली.
या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्याचे नाईक शेळके तपास करीत आहेत.