आळंदीतील एमआयटी महाविद्यालयात मीडिया रिफ्लेक्शन कार्यक्रम उत्साहात साजरा
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । एम. आय. टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आळंदी, पुणे यांच्या कला आणि वाणिज्य विभागाने मीडिया रिफ्लेक्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विविध स्पर्धांसाठी शंभर हून अधीक स्पर्धकांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये समावेश असलेले एफ. टी. आय. आय. क्राईस्ट कॉलेज, एमआयटी एडीटी विद्यापीठ व जवळील नाशिक, बारामती आणि इतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला होता.
या कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये टॅलेंट हंट, डूडल व पोस्टर मेकिंग, फोटोग्राफी स्पर्धा, शॉर्ट फिल्म अँड डॉक्युमेंटरी स्पर्धा, अडवर्ट्झिंग क्विझ, साडी वेरिंग (फक्त मुलांसाठी) अश्या स्पर्धा चा समावेश होता.
मीडिया रिफ्लेक्शन इव्हेंट चे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार तसेच मीडिया एक्सपर्ट समीरण वाळवेकर आणि मराठी सृष्टीतील गाजलेले अभिनेते पुष्कराज चिरपुटकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. कला व विज्ञान वाणिज्य विभागाने मास कम्युनिकेशन व पत्रकारिता या क्षेत्रात करिअर निवडू इच्छित नाऱ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मीडिया रिफ्लेक्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
दोन दिवसीय कार्यक्रमात उपस्थित असलेले दिल दोस्ती दुनियादारी व दिल दोस्ती दोबारा या मराठी मालिकेतील गाजलेले अभिनेते पुष्कराज चिरपुटकर यांनी विद्यार्थ्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत संबंधित विषयावर मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी जेष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी दूरदर्शन ते नवीन मीडिया न्यूज चॅनल व बातमी बाबत अनुभव, निरीक्षण सातत्य या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी प्रकल्प संचालक विजय खोडे, महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. बी. बी वाफारे, उपप्राचार्य मानसी अतीतकर, उपप्राचार्य अक्षदा कुलकर्णी, प्राध्यापक, विभाग प्रमुख डॉ. पद्मावती उंडाळे, प्राध्यापक जी. बी. सिंग व कार्यक्रमाचे कॉरडीनेटर प्राध्यापक पल्लवी घुगे, सायली कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.
इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी माधवी रेड्डी, प्रोफेसर आणि मीडिया आणि कम्युनिकेशन स्टडी विभागाच्या प्रमुख व स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन सायन्स (एस. पी. पी. यु.) संचालिका यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांचे मौल्यवान अनुभव सांगितले तसेच उपस्थित पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी विभाग प्रमुख डॉक्टर पद्मावती उंडाळे प्रोफेसर अक्षदा कुलकर्णी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक जी. बी. सिंग व पल्लवी घुगे यांनी केले. प्रोफेसर अर्चना आहेर, प्रोफेसर दीक्षा कदम, प्राध्यापक अभिजीत नेटके, डॉ. अनिल स्वामी, प्रवीण खरात, प्राध्यापक सुरेखा गायकवाड यांच्यासह विद्यार्थी समन्वय मुस्कान शर्मा, कनिका पांडे व मानसी काळे तसेच इतर विद्यार्थी यांनी कष्ट घेतले यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी. बी. वाफारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानस वंदन करत संपन्न झाली.