नाशिकरोड स्थानकावर रेल्वेला भीषण आग; मोठा अनर्थ टळला
by
sahyadrilive
November 5, 2022 11:00 AM
नाशिक । सह्याद्री लाइव्ह । नाशिक रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीच्या एका बोगीला आग लागली. स्टेशनवर रेल्वे थांबली असताना ही घटना घडली आहे. यानंतर प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं आहे. सध्या आग नियंत्रणात आली आहे.
हावडा मुंबई शालिमार एक्सप्रेस मधील कपड्याच्या बोगीला आग लागली आहे. आगीमुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला आहे. नाशिक अग्निशमन दलाचे बंब रेल्वे स्थानकात दाखल झाले आहेत.
नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर हावडा बोगीला एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकात पोहचताच आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. कपड्यांच्या बोगीला ही आग लागली आहे. आग लागताच तात्काळ प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं होतं त्यामुळे मोठा अनर्थ टळला अस म्हणता येईल.