अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; बळीराजाच्या चिंतेत वाढ
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने विशेष सन्मान
खेड । सह्याद्री लाइव्ह । राज्यभरात ठिकठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाला असून शासनाने लवकरात लवकर शेतक-यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.
खेड तालुक्यात अनेक ठिकाणी रविवारी संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याचे सर्वाधिक प्रमाण तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. तालुक्यात अजूनही ढगाळ वातावरण आहे. पाऊस, गारपिट आणि सोसाट्याच्या वाऱ्याने खरिप हंगामातील पिके भुईसपाट झाली. अचानक बदलेल्या हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे भात पिकाचे माठे नुकसान झाले आहे. तसेच रब्बी हंगानातील कांद्याच्या पिकाला फटका बसणार आहे. भात पिकाची काढणी अंतीम टप्यात आली असून कांदा लागवडीला झालेली सुरूवात त्यातच कांदा लागवडीसाठी तयार झालेली रोपे, काही ठिकाणी आंब्याला आलेला मोहर अशा सगळ्याचेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाले.
रविवारी दुपारी चास, कमान, कान्हेवाडी, कडधे, वाडा तसेच चिखलगांव, कळमोडी, सुरकुंडी, माजगांव, दोओशी, साकुर्डी, औदर यांसह अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यांबरोबर मुसळधार पाऊस झाला. चिखलगांव, कळमोडी व परिसरात गारपीट झाली. या पावसाने खरिप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले असून भातापिकापासून मिळणारा चारा-पेंढा, डोंगर उतारावरील चारा म्हणून वापरले जाणारे गवत तसेच कांदा रोपे वाया गेली. कडधे येथे काँक्रिटचे रस्ते केल्यावर योग्य उतार न दिल्याने मुसळधार पावसाने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरातील चिजवस्तू, धान्य भिजले व ते खराब झाले या शिवाय घरात चिखलाचा थर साचला आहे.
या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. खेडचे तहसिलदार प्रशांत बेडसे यांनी तालुक्याच्या सर्व प्रशासकिय विभागाची संयुक्त बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES