MakarSankranti2022 : तीळ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, बीपीपासून शुगरपर्यंत सर्व काही नियंत्रित राहते
मकर संक्रांती १४ जानेवारीला साजरी होणार आहे. लोहरी आणि मकर संक्रांती या दोन्ही सणात तीळ आणि तिळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. तिळाच्या लाडूपासून गजक आणि तीळ गुळाच्या रेवडी पर्यंत लोक चवीने हे पदार्थ खातात.
सणासुदीत तीळापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करण्याचे शास्त्रानुसार महत्त्व आहे, पण तिळात आयुर्वेदाचेही गुणधर्म आहेत, त्यामुळे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तिळा मध्ये आढळणारे पोषक तत्व अनेक आजारांपासून बचाव करतात. त्यांचे नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
तिळाचे सेवन हे धार्मिक महत्त्व आणि श्रद्धांसोबतच आयुर्वेदातही महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते. जर तुम्ही लोहडी आणि मकर संक्रांतीत तिळापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करणार असाल तर जाणून घ्या तीळ खाण्याचे कोणते फायदे आहेत ज्यामुळे तुम्ही केवळ सणांच्या वेळीच नाही तर इतर दिवशीही तिळाचे सेवन करू शकाल.
तीळात ‘हे’ पोषक घटक असतात
तीळामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. तिळाच्या बियांमध्ये फायबर आणि मॅग्नेशियम असते आणि त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तिळाच्या बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि सेलेनियम यांसारखे विविध क्षार असतात.
तिळामुळे ‘या’ आजारांचा धोका कमी होतो.
तिळामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.
. तिळामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, ल्युकेमिया, प्रोस्टेट कर्करोग, स्तनाचा कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.
यामध्ये असलेले फायबर आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म शरीरातील इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी नियंत्रित करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ते फायदेशीर आहे.
तीळ खाण्याचे फायदे
. तीळाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण योग्य राहते.
. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी तीळ फायदेशीर आहे.
. केस आणि त्वचा मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी तिळाचे नियमित सेवन फायदेशीर ठरते.
. तीळ खाल्ल्याने मेटाबॉलिज्म चांगले काम करते. यातील प्रथिने शरीराला भरपूर ताकद आणि ऊर्जा देतात.
. तीळ मुलांसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात आहारातील प्रथिने आणि अमीनो ऍसिड असतात, जे मुलांच्या हाडांचा विकास वाढवतात.
तीळ सेवन केल्याने होणारे तोटे
. तिळाचे सेवन फायदेशीर आहे, परंतु जर ते योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे सेवन केले नाही तर ते हानिकारक देखील असू शकते. ज्या लोकांना बीपी कमी होण्याची तक्रार आहे त्यांनी तीळ कमी खावेत.
. तीळ जास्त खाल्ल्यानेही जुलाब होऊ शकतात.
. महिला आणि मुलांनी तिळाचे सेवन कमी प्रमाणात करावे..