महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
शाळेचे ३२ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीसाठी पात्र
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. शाळेचे ३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवीचे ३ विद्यार्थी आणि आठवीचे २९ विद्यार्थी आहेत, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य सुनील जाधव यांनी दिली.
इयत्ता आठवीतील विद्यार्थी सात्विक भोकसे हा राज्य गुणवत्ता यादीत चौथा तर पुणे जिल्ह्यात प्रथम आला आहे. शाळेचे काही विद्यार्थी राज्य आणि जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना रेश्मा साळे, तुलसीदास घोलप, रामकृष्ण आंधळे, प्रिया कुटे, मंगल गावडे, उर्मिला मुळूक, सुवर्णा कापसे, प्रतिपदा गोरडे, कविता वायाळ, नयना लोखंडे, गुलाब थिटे, स्मिता निकम, शीतल ढवळे, मृणाल कुलकर्णी, सोनाली दरेकर यांनी मार्गदर्शन केले.
खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव गणेश जोशी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रा. बबन थोरात, सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक सुनील जाधव, उपमुख्याध्यापिका संध्या कांबळे, पर्यवेक्षक दशरथ पिलगर, विलास खोमणे, बाळासाहेब गाडेकर, पांडुरंग डावरे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.
हे आहेत गुणवंत विद्यार्थी
इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
1) सौरभ धोत्रे (256 गुण)
2) गुंजन पाटील (246 गुण)
3) आहना इनामदार (222 गुण)
इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
राज्य गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी
1) सात्विक भोकसे – (286 राज्य गुणवत्ता यादीत – चौथा व पुणे जिल्ह्यात प्रथम)
2) ऋग्वेद नेहेरे – (268 राज्य गुणवत्ता यादीत – 20 वा)
3) कनुप्रिया सांडभोर – (268 राज्य गुणवत्ता यादीत – 20 वी)
जिल्हा गुणवत्ता यादीतील यशस्वी विद्यार्थी
1) पार्थ लोखंडे – (254 गुण),
2) वेदांत पोखरकर – (248 गुण),
3) वेदांत धंन्द्रे – (246 गुण),
4) साहिल गोपाळे – (236 गुण),
5) सिद्धीका ढवळे – (234 गुण),
6) तनिष्का मांजरे – (232 गुण),
7) मृणाल जाधव – (226 गुण),
8) साईराज फापाळे – (222 गुण),
9) सोहम काळे – (220 गुण),
10) प्रचिती शिंदे – (218 गुण),
11) संस्कार कोरडे – (218 गुण),
12) चैत्राली गोपाळे – (218 गुण),
13) तनिष्का सावंत (214 गुण),
14) वेदांत पवार (212 गुण),
15) अथर्व सांडभोर – (210 गुण),
16) पियुष पवार – (208 गुण),
17) आर्यन पवळे – (208 गुण),
18) वेदांत हिरवे – (206 गुण),
19) सिद्धांत नंदे – (206 गुण),
20) शुभश्री राऊत – (202 गुण),
21) शताक्षी वाकचौरे – (202 गुण),
22) तन्मय बगाटे – (202 गुण),
23) जयेश दजगुडे – (202 गुण),
24) प्राची तिटकारे – (200 गुण),
25) दुर्वेश शिंदे – (200 गुण),
26) संस्कार नाईकडे – (200 गुण)
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES