“महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । केंद्र सरकारच्या समान नागरी कायदा करण्याच्या धोरणाला काही राज्यांमधून प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागु होणार का? असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करत योग्य वेळी समान नागरी कायदा महाराष्ट्रातही लागु करावा लागेल असे मत व्यक्त केले आहे.
फडणवीस म्हणाले, “समान नागरी कायदा गोव्यात आहे, आता उत्तराखंडही हा कायदा लागू करत आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत. हळूहळू सर्व राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करतील. शिवाय त्यांना करावाच लागेल”.
“संविधानाने प्रत्येक राज्यात समान नागरी कायद्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे हळूहळू सर्व राज्ये हा कायदा लागू करतील असं मला वाटतं”, “महाराष्ट्रही योग्यवेळी हा कायदा लागू करण्याबाबत विचार करेल. संविधानाने याबाबत आपल्यावर जबाबतदारी टाकलीय की आपण राज्यात समान नागरी कायदा आणावा” असेही ते म्हणाले.