महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतींचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध
by
sahyadrilive
February 20, 2023 5:29 PM
पुणे । सह्याद्री लाइव्ह । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मुलाखतींचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. उमेद्वारांना आयोगाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक पहायला मिळेल. तसेच आयोगाने Tweet करत हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ साठीच्या मुलाखती नियोजित केल्या आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या २३ आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात मुलाखती घेण्यात येणार होत्या मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.
२८ फेब्रुवारी रोजी मुंबईत या मुलाखती होणार आहेत. यासाठी आयोगाने परीक्षा क्रमांकानुसार वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबईतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य़ा कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.