ग्राहकाभिमूख सेवा पुरवण्यासाठी महावितरण तत्पर; ग्राहकांना चोवीस तासात ग्राहकांना नवीन विजजोडणी
पुणे । सह्याद्री लाइव्ह । वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमूख सेवा पुरवण्यासाठी महावितरण सक्रीय झाले आहे. नवीन वीजजोडणी तत्काळ देण्यासह बिलदुरुस्ती, फ्यूज कॉल व दुरुस्तीच्या कामांचा निपटारा वेळेत करण्यात येत आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी तात्काळ वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या असून वरिष्ठ पातळीवर याचा नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे.
ग्राहक सेवेला केंद्रबिंदु मानून महावितरणने आपल्या कामात लक्षणीय सुधारणा केलेल्या आहेत. याचाच परिणाम म्हणजे एप्रिल २०२३ पासून आजतागायत महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागात नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करून सर्व प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ३१९ ग्राहकांना अवघ्या चोवीस तासांच्या आत नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मागील एप्रिल महिन्यात ७४, मे महिन्यात ५१, जून महिन्यात ९३ व जुलै या चालू महिन्यात १०१ ग्राहकांना अवघ्या चोवीस तासात वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. यानुसार एप्रिलपासून बारामती परिमंडळात १५७, कोल्हापूर परिमंडळात ६३ व पुणे परिमंडळात ९९ ग्राहकांना चोवीस तासात वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
नवीन वीज जोडणी देण्यासाठी पायाभूत वीज यंत्रणा उभारणीची आवश्यकता नसलेल्या सर्व वीज जोडण्या चोवीस तासाच्या आत देण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिल्या होत्या. गेल्या तीन ते चार महिन्यात ३१९ ग्राहकांना चोवीस तासात वीज जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES