एम. आय. टी. महाविद्यालयात “सायबर गुन्हे व जागरुकता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । एम. आय. टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सायबर सेल विभाग मार्फत “सायबर गुन्हे व जागरुकता” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या साठी प्रमुख वक्ते विक्रांत पवार (प्राचार्य सायबर गुन्हे व फोरेन्सिक विभाग मुंबई) यांनी समाजामध्ये सोशल नेट्वर्किंग साइट्स वापरताना विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच इतर सामाजिक व्यवस्थांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे हे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व्यवस्थेत समाज माध्यमांचा वापर सकारात्मक पद्धतीने केला पाहिजे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
सायबर कायदा, सायबर दक्षता, सायबर गुन्हे, समाजामध्ये घडणाऱ्या विविध सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. विद्यार्थांना सायबर गुन्हा कशा पद्धतीने घडू शकतो? इंटरनेटच्या सगळ्याच समाज माध्यमांना आपण कशा पद्धतीने हाताळतोय? आणि ते हाताळत असताना कोणती जागरुकता घेतली पाहिजे? याची माहिती दिली. याच बरोबर सायबर सुरक्षा या मध्ये खूप मोठ्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी विध्यार्थांना सागितले.
सायबर सुरक्षा या विषयावर एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आळंदी येथे ‘सायबर जागरुकता’ या विषयावर नवींन अभ्यासक्रम सूरू करण्यात आला आहे. उपाप्रचार्या प्रा. अक्षदा कुलकर्णी यांनी वक्त्यांचे स्वागत केले, या व्यख्याना साठी महाविध्यालाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांचे मार्गदर्शन लाभले. या व्याख्यानाचे आयोजन सायबर सेल विभाग प्रमुख प्रा. वैशाली खर्डेकर, प्रा. रोहिणी तारडे, डॉ. रुतुजा देशपांडे, प्रा. अरविंद वागस्कर प्रा. संजय गुंजाळ, प्रा. संदीप ढवळें यांनी केले या कार्यक्रमला बीबीए विभागाचे विभागप्रमुख डॉ. मंगेश भोपळे हे उपस्थित होते.