एम. आय. टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
आळंदी । सह्याद्री लाइव्ह । एम. आय. टी. कला वाणिज्य व व विज्ञान महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलने व स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन सेल यांनी 17 एप्रिल 2023 रोजी “स्टार्ट-अप सुरु करताना कोणत्या कायदेशीर आणि नैतिक गोष्टी केल्या पाहिजेत यावर एक दिवसीय कार्यशाळे आयोजन करण्यात आले.
या एक दिवसीय कार्यशाळेला डॉ. अरविंद शाळीग्राम (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठं IIC अध्यक्ष व रिसर्च पार्क फाउंडेशनचे सीईओ यानी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी स्टार्ट-अप नोंदणीसाठी प्रारंभिक तयारीबद्दल विस्तृत माहिती दिली, स्टार्ट-अप साठी कायदेशीर नैतिक पावले कशी घ्यावी हे सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयातिला इनोव्हेशन सेल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. स्टार्ट-अप व इनोव्हेशन सेल लॅबच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. बी. बी. वाफरे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना स्टार्ट-अप बद्दल अर्थपूर्ण समज प्रदान करणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. कार्यशाळा विद्यार्थी समुदायाला स्टार्ट-अप आणि इनोव्हेशनमधील आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि देशाला आवश्यक असलेल्या पुढच्या पिढीच्या नेत्यांमध्ये रूपांतरित करण्यासाठी अधिक अनुकूल तयार करणे या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेला उपप्राचार्य प्रा. अक्षदा कुलकर्णी, डॉ. मानसी अतितकर आणि विविध विभागांच्या प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन स्टार्ट-अप आणि इनोव्हेशन सेलचे प्रमुख आणि आयआयसी संयोजक प्रा. अभिजित नेटके यांनी केले. डॉ. अर्चना आहेर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले व पाहुण्यांचा परिचय प्रा. आकांशा लांडगे यांनी केला आभार प्रदर्शन प्रा. श्रीराम कारगावकर यांनी प्रा. अमोल माने, प्रा. संजय गुंजाळ, प्रा. वसनात करमड, प्रा. कविता महाजन, प्रा. प्रिती भारंबे, प्रा. पल्लवी बोंगाणे यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेमध्ये सर्व विद्या शाखेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांणी सहभाग नोंदविला.