एम.आय.टी. कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आळंदी येथे विद्यार्थ्यांनी शोधनिबंध कसे लिहावे आणि ते कसे प्रकाशित करावे या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन
आळंदी। सह्याद्री लाइव्ह । एम. आय. टी. कला वाणिज्य व व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व संशोधन विकास कक्ष याच्या सयुंक्त विद्यमाने “शोधनिबंध कसे लिहावे आणि ते कसे प्रकाशित करावे या विषयावर तीन दिवसीय व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्यशाळेमध्ये ३१८ विद्यार्थांनी सहभाग घेतला. पहिल्या दिवशी डॉ. सुनीता बर्वे, केआरसी प्रमुख, सी एस आय आर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे, यांनी संशोधन काय आहे, संशोधनाची संकल्पना कशी निवडतात, वैज्ञानिक शोधनिबंध लिहिणे ही एक कला आहे. तसेच अत्याधुनिक ज्ञानावर आधारित कौशल्य आहे. वैज्ञानिक शोधनिबंध कसा लिहायचा या विषयावर व्याख्यान दिले.
दुसऱ्या दिवशी व्याख्यान डॉ. रतिकांत डायरेक्टर ग्लोबल रिसर्च अँड ट्रेनिंग फोरम. डिजिटल युगातील गतिशीलता, गुणवत्ता संशोधन या विषयावर व्याख्यान देले. त्यांनी सदर व्याख्यानात इंटरनेटच्या विकास आणि प्रसाराद्वारे संशोधकांना उपलब्ध असलेल्या अनेक साइट्स आणि संधी, डिजिटल तंत्रज्ञान आणि जगातील विकसनशील डिजिटल पायाभूत सुविधा संशोधन करण्याच्या वास्तविक प्रक्रियेसाठी गुणात्मक संशोधकांना काय देऊ शकतात. आता अस्तित्वात असलेल्या संधींची चर्चा केली ज्यांचा आपण प्रयोग केला पाहिजे आणि स्वतःच्या संशोधनात त्याची अंमलबजावणी केली पाहिजे याबद्दल माहिती दिली
तिसर्या दिवशी व्याख्यान डॉ. राजेंद्र कुंभार प्राध्यापक ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांनी शोधनिबंध कसा लिहावा आणि तो कसा प्रकाशित करावा या विषयावर व्याख्यान दिले, त्यांनी सदर व्याख्यानत संशोधन पेपर लिहिणे कसे सुरू करावे विषय निवडणे प्राथमिक वाचन आणि रेकॉर्ड ठेवणे, बाह्यरेखा, संशोधन तथ्ये आणि उदाहरणे लेखन, परिचय, निष्कर्ष इत्यादी माहती दिली, शोधनिबंध लिहिण्यासाठी सात पायऱ्या कोणत्या या बादल विध्यार्थ्यानी मार्गदर्शन केले.
कार्यशाळाचे उद्घाटन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. वाफारे यांनी केले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय विभागाचे विभाग प्रमुख प्रा. राहुल बारथे, संशोधन विकास कक्षचे प्रमुख प्रा. अनिकेत नागाने , प्रा. शीतल घोटेकर , प्रा. संजय गुंजाळ, प्रा. बरीन शेख, प्रा. वंदना पगार प्रा.निशिगंधा भालेकर, प्रा. प्रवीण खरात, ग्रंथालय विभागातील निलेश मते, सारिका पडवळ ,सुनिता साबळे , सुवर्णा सानप व संगणक प्रयोगशाळा समन्वयक, संदीप मुळे , ऋतूंज देशमुख , पंकज मोरे , मंगेश सोनावणे यांनी योगदान देले ,या प्रसंगी उपप्रचार्या प्रा.अक्षदा कुलकर्णी , डॉ. मानसी अतितकर, बीबीए सीए विभाग प्रमुख डॉ. विकास महांडुळे, बीबीए विभाग प्रमुख डॉ. मंगेश भोपळे, बी.एसी (संगणकशास्त्र) विभाग प्रमुख डॉ. संगीता बिराजदार, कला आणि वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. पद्मावती उंडाळे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.