उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरवठा विभागाचा गौरव
पुणे : पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा विभागाला आयएसओ मानांकन देण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे विभागीय कार्यालयाच्या पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्ह्याने आयएसओ मानांकनामध्ये चांगली कामगिरी केल्याने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा उप आयुक्त त्रिगुण कुलकर्णी, सहायक विभागीय पुरवठा अधिकारी सुनंदा भोसले पाटील, तांत्रिक अधिकारी संतोष गरडे, अव्वल कारकून शितल शिर्के, मोहिनी मुंढे, मानसी काळे तसेच लघूटंकलेखक रूपाली गाडेकर यांचा प्रशस्तीपत्र देत गौरव करण्यात आला.
पुणे विभागातील उपआयुक्त पुरवठा कार्यालय, विभागातील सर्व जिल्हा पुरवठा कार्यालये, सर्व अन्नधान्य वितरण कार्यालये, सर्व तहसील कार्यालयातील पुरवठा शाखा, सर्व गोदामे, सर्व परिमंडळ कार्यालये यांचे आएसओ ९००१२०१५ व आयएसओ २८०००-२००७ मानांकन करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम रबविण्यात आला होता.
पुणे विभागातील ९ हजार १६४ रास्तभाव दुकानांपैकी ७ हजार ९३१ रास्तभाव दुकानांना आयएसओ ९००१-२०१५हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पुणे विभागातील सर्व कार्यालये व रास्तभाव दुकाने यांना एकूण ८ हजार ९४ प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली