कोजागिरी पौर्णिमा
सह्याद्री लाइव्ह । भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभांना विशेष महत्त्व आहे. नवरात्रीनंतर पाच दिवसांनी येणारी पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या सणालाही विशेष महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभर आपण बारा पौर्णिमा पाहतो .परंतु त्यातील अत्यंत महत्त्वाची व शुभलदायी असणारी पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा.
संपूर्ण वर्षात केवळ याच दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो केवळ याच दिवशी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने संपूर्ण जीवसृष्टीसाठी हे खूप फलदायी आहे. शारीरिक दृष्ट्या रात्री जागरण अत्यंत लाभदायक असते. लंकाधिपती रावण याच दिवशी चंद्राची किरणे आपल्या नाभीद्वारे ग्रहण करीत असे म्हणून त्याला पुन्हा पुन्हा तारुण्यप्राप्ती होत असल्याची आख्यायिका पुरानात आहे.
असे म्हणतात की लक्ष्मी देवी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आकाश भ्रमण करते व जागरण करणाऱ्या व्यक्तीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद देते.
वैज्ञानिक दृष्ट्या दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृतत्व असते हे तत्व चंद्राच्या किरणांमधून मोठ्या प्रमाणावर शक्ती ग्रहण करते म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशात दूध आठवले जाते. असे म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने याच दिवशी महारास आयोजित केला होता. म्हणून या दिवशी मोठ्या प्रमाणावर महारास साजरा केला जातो.