कोहिंडे बु. शाळेत क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
कोहिंडे बुद्रुक । सह्याद्री लाइव्ह । क्रांतीवीरांना अभिवादन करत क्रांती दिन आणि त्याचबरोबर आदिवासी दिनही बुधवारी (दि. ९) सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. न्यु इंग्लिश स्कूल कोहिंडे बुद्रुक विद्यालयातही या निमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेमध्ये सर्व क्रांतिकारक व थोर समाज सुधारकांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.
या प्रसंगी न्यु इंग्लिश स्कुल कोहिंडे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी आणि त्याबरोबर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या वेशभूषा स्पर्धा व आदिवासी गीत गायन स्पर्धा यावेळी पार पडल्या. विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केल्या होत्या. कार्यक्राच्या वेळी विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्यात आला. विद्यार्थ्यांसह उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारक व भारत मातेचा जयघोष केला.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES