आसखेड खुर्द ग्रामपंचायती रुख्मिणी लिंभोरे यांची बिनविरोध निवड
आसखेड खुर्द । सह्याद्री लाइव्ह । आसखेड खुर्द ग्रामपंचायतीच्या रिक्त सरपंचपदाच्या निवडणूकीत रुख्मिणी भरत लिंभोरे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर सर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. नवनिर्वाचित सरपंचांची डिजे लावत भंडारा आणि गुलालाची उधळण करत गावातून मिरवणूक काढण्यात आली.
माजी सरपंच प्राची लिंभोरे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंचपद रिक्त झाले होते. रिक्त सरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात शनिवारी (दि. २२) झाली. या पदासाठी रुख्मिणी लिंभोरे यांचाच एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी तथा पंचायत विस्तार अधिकारी सेवक थोरात यांनी केली.
निवडणूकीचे प्रशासकीय कामकाज ग्रामसेवक तानाजी पाटील यांनी पाहिले. निवडणूक प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच रुख्मिणी लिंभोरे, मावळत्या सरपंच प्राची लिंभोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गावडे, सोनाली लिंभोरे, अश्विनी लिंभोरे उपस्थित होते.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES