हुतात्मा राजगुरू सैनिक सेवा चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन दिन थाटामाटात संपन्न
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । हुतात्मा राजगुरू सैनिक सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन रविवारी (दि.१३) पुणे नाशिक महामार्गावरील साईकृपा लॉन्स, संतोष नगर या कार्यालयात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. ठाण्याचे राज्यकर सह आयुक्त बळवंतराव टोपे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
या कार्यक्रमासाठी निवृत्त ले. जनरल राजेंद्र रामभाऊ निंभोरकर, सर्जिकल स्ट्राइक चे जनक लेफ्टनंट कर्नल सतिश हंगे, कीर्ती चक्र विजेते सुभेदार संतोष राळे, महाराष्ट्र राज्य सैनिक शेतकरी आघाडीचे अध्यक्ष नारायण अंकुशे, खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहीते पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, नियोजन समितीचे सदस्य अतुल देशमुख, वखार महामंडळाचे सेवानिवृत्त उपमहाव्यवस्था व्यवस्थापक किसन टोपे, नगरपरिषद कम्प्युटर इंजिनिअरिंग प्रतीक्षा निकुंभे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्याबरोबर जुन्नर, आंबेगाव, मांदळवाडी, वडगाव शेरी, शिरूर तालुका, वाकी बुद्रुक या सर्व संघटनांचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू नावाच्या सर्व संघटना उपस्थित होत्या.
दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. तसेच संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय टोपे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वीर माता, पिता, वीर पत्नी, यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यातील गुणवंत विद्यार्थी, दहावी बारावी सैनिक पाल्य, हुतात्मा राजगुरू सैनिक संघटनेमधील नवीन सभासद तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन हुतात्मा राजगुरू सैनिक संघटनेचे अध्यक्ष संतोष भोगाडे व सर्व पदाधिकारी यांनी केले. प्रसिद्ध निवेदक शिवव्याख्याते प्रा. संदीप देशमुख यांनी निवेदकाचे काम केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत केले. आनंद ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन आणि सैनिकांच्या अडीअडचणीबाबत चर्चासत्र झाले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES