कोहिंडे बु. गावच्या शाळांमध्ये भारतरत्न जे. आर. डी. टाटा जयंती सप्ताह
कोहिंडे बु.(ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । भारतीय विमान वाहतूक उद्योगाचे जनक भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांचा २९ जुलै हा जन्मदिवस शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. कोहिंडे बु. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व न्यू इंग्लिश स्कूल कोहिंडे बू. या शाळांमध्ये २४ जुलै ते २९ जुलै २०२३ या कालावधीमध्ये भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांचा जयंती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या जयंती सप्ताहानिमित्त सोमवारी (दि. २४) विद्यालयामध्ये जे. आर. डी. टाटा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाची सुरूवात करण्यात आली. टाटा मोटर्स भोसरी येथील पदाधिकारी विठ्ठल वाघचौरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. वाघचौरे यांनी मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून जे. आर. डी. टाटा यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी भास्कर देशमुख, प्रभू पवार, प्रसाद शिंदे, अवंतिका बहकर तसेच दोन्ही विद्यालयांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते. टाटा मोटर्स भोसरी येथील सेफ्टी डिपार्टमेंटचे हेड विठ्ठल वाघचौरे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. विद्यालयाच्या वतीने पाहुण्यांचे आभार मानण्यात आले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES