‘ढोलिडा’वर थिरकले किरीट सौमय्या
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकतीच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात त्यांनी सापत्नीक गरबा करत कार्यक्रमाचा आनंद लुटला. सोशल मिडीयावर त्यांचा हा डान्स सध्या व्हायरल होत आहे.
‘चला हवा येऊ द्या’च्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये तसेच आजच्या भागाच्या प्रोमो मध्ये किरीट सोमय्या बॉलिवूडच्या ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटातील ढोलिडा या गाण्यावर गरबा करताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या डान्समूळे प्रेक्षकांना आजच्या भागाची आतुरता लागली आहे.
लोकप्रिय मराठी रियालिटी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अनेक दिग्गज अभिनेत्यांची चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वर्दळ असते. राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी यांनी कार्यक्रमाचा आनंद कसा लुटला हे आज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.