टेनिसपटू अचंता शरथ कमलला खेल रत्न पुरस्कार
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह । सर्वोच्च मानांकित भारतीय टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलची यंदाच्या मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. अचंता शरत कमलने भारताला टेबल टेनिस मध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकुन दिले होते.
नऊ वेळा सिनियर नॅशनल चॅम्पियन बनणारा अचंता शरथ कमल हा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू आहे. मनिका बात्रानंतर खेल रत्न पुरस्कार मिळवणारा शरथ हा दुसरा टेबल टेनिस खेळाडू ठरला आहे.
याचबरोबर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि कुस्तीपटू अंशू मलिकची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. 40 वर्षाच्या शरथ कमलने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. त्याने तीन सुवर्ण पदके आणि एक रौप्य पदक जिंकले होते.
दरम्यान, यंदा एकूण 25 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यात युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, बॉक्सर निखत झरीन आणि बुद्धीबळपट्टू प्रज्ञानंदा, कुस्तीपटू अंशू मलिक यांची देखील समावेश आहे.