खेड तालुक्यातील पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेला स्थगीती
खेड । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदांसाठीची लेखी परीक्षा १ ऑगस्टला होणार होती. पावसाचा अंदाज घेऊन प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा तुर्तास स्थगित करण्यात आली असल्याचे खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी कळवले आहे.
पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ३ जुलै २०२३ रोजी पोलीस पाटील पदासाठीच्या भरती प्रक्रियेबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. भरतीसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरतीप्रक्रियेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता परीक्षा घेण्यात येणार होती.
पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल सप्ताह आयेजित करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील काही गावांतील पुणे वर्तुळ रस्त्याची संपादित जमीनीच्या मोजणीची तारीख निश्चित केलेली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रोहकल येथील जमीन संपादनाच्या अनुशंगाने मोजणी स्थगित करण्याबाबत शेतक-यांनी निवेदन दिले आहे. ही परीस्थिती लक्षात घेता लेखी परीक्षेला तुर्त स्थगिती देण्यात आली आहे. परिक्षेची पुढील तारीख खेड उपविभागीय कार्यालयाकडून कळवण्यात येईल.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES