खेड तालुका माजी सैनिक बहुउद्देशीय सहकारी संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुका माजी सैनिक बहुउद्देशीय सहकारी संस्थेचा रौप्य महोत्सव रविवारी (दि.१३) राजगुरुनगर येथील खांडगे लॉन्स मध्ये उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर उपस्थित होते. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष एअर कमोडर गणेश जोशी, उपाध्यक्ष तानाजी आरबुज, महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेज हंगे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अनिल राक्षे, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, संचालक हिरामण सातकर, डॉ. प्रदीप शेवाळे, विनायक दीक्षित आणि खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर व पुण्यातील माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर अभिवादन गीत सादर करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एअर कमोडर गणेश जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा गांधी विद्यालयाचे अध्यापक लतीफ शाह व अध्यापिका अर्चना गोडसे यांनी केले. अभिवादन गीतगायन के. टी. ई. एस. इंग्रजी माध्यम विद्यालयाच्या अध्यापिका तेजस्विनी शिंदेकर यांनी केले. आभारप्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी आरबुज यांनी केले.