KHED CITY CRIME : ‘सीसीटीईबी’ कंपनीमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला
निमगाव । सह्याद्री लाइव्ह । खेड सिटी येथे एका तरुणावर पाच जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. निमगाव खंडोबा गावच्या हद्दीतील सी. सी. टी. ई. बी. कंपनीत सोमवारी (दि. २०) हा प्रकार घडला.
पवन नंदाराम सुर्वे (वय ३१, रा. निमगाव, ता. खेड, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समाधान बाबाजी कोठावळे (वय 30, रा. कोठावळेवस्ती, निमगाव, ता. खेड, जि. पुणे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अमर कांताराम शिंदे, सनी शिंदे, हर्षवर्धन शिंदे, आण्णा शिंदे (चौघे रा. निमगाव, ता. खेड) आणि हर्षद राक्षे (रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड सिटीमधील सीसीटीईबी कंपनीत सोमवारी (दि. २०) फिर्यादी समाधान कोठावळे आणि त्याचा मित्र पवन सुर्वे गेले होते. त्यावेळी आरोपी अमर शिंदे आणि सनी शिंदे यांच्यासोबत किरकोळ बाचाबाची झाली. अमर शिंदे याने सनी शिंदे, हर्षवर्धन शिंदे, आण्णा शिंदे आणि हर्षद राक्षे यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर या पाच जणांनी सोबत आणलेल्या लाकडी दांडा व लोखंडी गज, हॉकी स्टीकने पवन सुर्वे याच्या डोक्यावर, पाठीवर, डोळ्यावर व पायावर गंभीर दुखापत केली. यामध्ये पवन सुर्वे गंभीररित्या जखमी झाला आहे.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रानगट तपास करीत आहेत.