हेरा फेरी ३ मध्ये ‘कार्तिक आर्यन’
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी यांच्या अभिनयाचा मास्टरपीस म्हणजे “हेरा फेरी”. या सिनेमाच्या पहील्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले, असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाचा तिस-या भागाची चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहे. या चित्रपटात कोण कोण कलाकार असतील?, चित्रपटाची कहानी काय असेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
यादरम्यान आता ‘हेराफेरी 3’ संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. कार्तिक आर्यन ‘हेराफेरी 3’ दिसणार आहे. परेश रावल यांनी या बातमीला कन्फर्म केलं आहे. ही मोठी बातमी कळल्यावर आता सोशल मीडियावर #Herapheri3 ट्रेंड होताना दिसत आहे.
परेश रावल यांनी ट्वीटरवर एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. त्यांना चाहत्यानं विचारलं होतं की, ‘परेश रावल सर, हे खरं आहे का की कार्तिक आर्यन ‘हेरा फेरी 3′ मध्ये काम करत आहे?’ त्यावर परेश रावल म्हणाले, ‘हो, हे खरं आहे’.