ही भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे” – अक्षय कुमार
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । आपण काहीतरी वेगळं आणि नवीन घेऊन येत आहोत अशी घोषणा अभिनेता अक्षय कुमारने दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर त्याच्या अगामी चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. नुकतीच अक्षय कुमारने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. रियल लाईफ हीरो अशी ख्याती असणारे जसवंत सिंग गिल यांच्या आयुष्यावर तो बायोपिक करत आहे. जसवंत सिंग गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील आपला फर्स्ट लूकही रिव्हील केला आहे.
1989 मध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या ६४ खाण कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीतून बाहेर काढणारे इंजिनियर जसवंत सिंग गिल यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट लवकाच येत आहे. वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांचे पूजा एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अक्षयने स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. सरदार जसवंत सिंग गिल यांची भूमिका साकारण्याची संधी मिळणे हे माझे सौभाग्य आहे, असे अक्षय आपल्या ट्विट मध्ये म्हणाला आहे.