सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
by
sahyadrilive
December 20, 2022 2:18 PM
नागपूर । सह्याद्री लाइव्ह। ‘पोहा चालला महादेवा’ सारख्या अजरामर नाट्यकृतीने महाराष्ट्राच्या रंगभूमीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमी ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’ या शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मदनजी गडकरी यांनी जवळपास सात दशके रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कलावंत आज मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीने जुन्या पिढीतील महत्त्वाचा मार्गदर्शक गमावला आहे, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.