काँग्रेसचा सदस्य असणे सौभाग्याची बाब – शशी थरूर
निकालानंतर दिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली । सह्याद्री लाइव्ह। काँग्रेस पक्षाध्यक्षाची निवडणूक सोमवारी झाली. त्यानंतर पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. काल या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात झालेल्या या लढतीत शशी थरूर यांचा पराभव झाला. या पराभवानंतर शशी थरूर यांनी खर्गे यांचे अभिनंदन करत आपली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले थरूर?
खर्गे यांच्या विजयाबद्दल मी त्यांच अभिनंदन करतो. पक्षाच्या प्रतिनिधींचा निर्णय अंतिम असतो आणि तो मी नम्रपणे स्वीकारतो. अशा पक्षचे सदस्य होणे ही सौभाग्याची बाब आहे, जो पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आपला अध्यक्ष निवडण्याची पवरवानगी देतो. सोनिया गांधी यांनी एकचतुर्थांश शतकासाठी आणि निर्णायक काळात पक्षाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांचे पक्षावर परतफेड न करता येणारे ऋण आहेत. नेहरू आणि गांधी कुटूंबियांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.