राजगुरुनगर नगरपरिषदेचे कर्मचारी ‘सफाई मित्र’ पुरस्काराने सन्मानित
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत सन्मान
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । नुकताच भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. स्वातंत्रयदिनानिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले होते. राजगुरुनगर नगरपरिषदेतही नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वजारोहण समारंभ पार पडला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ आणि ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अंतर्गत आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचा-यांना ‘सफाई मित्र’ व ‘जल योद्धा’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी राजगुरुनगर नगरपरिषदचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे आणि राजगुरुनगर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे यांच्यासह माजी नगरसेवक मनोहर सांडभोर, राहुल आढारी, मंगेश दादा गुंडाळ, आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नगरपरिषदेचे अधिकारी अविनाश काळाने, संध्या शिंगाडे, प्रतीक्षा निकुंभे व शहर समन्वयक प्रतिकेश सातकर उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व आरोग्य अभियंता चारूबाला हरडे यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. राजगुरुनगर नगरपरिषदचे मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES