प्रजासत्ताकदिनी आदिवासी खोऱ्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पावलांना मिळाला आधार
“आधार पावलांना” सामाजिक संस्थेच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना बुटाचे वाटप
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । “आधार पावलांना” सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील आदिवासी खोऱ्यातील शालेय विद्यार्थ्यांना पायातील बुटाचा वाटप करण्यात आला. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या मुलांना अनवाणी चालून शाळेत जावे लागते. याची दखल घेत आधार पावलांना सामाजिक संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील एकलहरे, धामणगाव, गोरेगाव, बांगरवाडी, माजगाव सुरकुंडी, आदी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शंभर शालेय विद्यार्थ्यांना बुटाचे वाटप करण्यात आले. संस्थेचा हा उपक्रम नववर्षापासून सुरू असून आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून बुटाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक जीवन लेंडघर, सचिव ॲड. मनोज जंबुकर, उपाध्यक्ष सुरेश जाधव, डॉ. पंचाक्षरी पुजारी, अप्पा धाडगे, तेजस धाडगे, पंढरी भाईक, राजू कुमिटकर तसेच संस्थेचे सर्व सभासद उपस्थित होते.