खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील थिगळे; सचिवपदी किरण खुडे यांची निवड बिनविरोध
तालुका पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी ‘खेड टाइम्स’चे संपादक रोहिदास होले यांच्या खांद्यावर
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील शांताराम थिगळे यांची, तर सचिवपदी किरण खुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघाच्या कार्याध्यक्षपदी ‘खेड टाइम्स’चे संपादक रोहिदास होले यांची बहुमताने निवड करण्यात आली.
प्रजासत्ताकदिनी खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. राजगुरुनगर येथील खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात मावळते अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नवनिर्वाचित पदाधिका-यांची निवड करण्यात आली.
या सभेत पुढील वर्षासाठी अध्यक्षपदी सुनील थिगळे यांची बिनविरोध, तर सचिवपदी किरण खुडे यांची तिस-यांदा फेरनिवड करण्यात आली. थिगळे यांना सर्वानुमते कार्यकारिणी निवडीचे अधिकार देण्यात आले. तसेच मागील सभेचे इतिवृत्त, जमा-खर्चाची माहिती सचिव किरण खुडे यांनी सभेला दिली. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.
खेड तालुका पत्रकारसंघाची ‘नवनिर्वाचित कार्यकारिणी’
सुनील थिगळे (अध्यक्ष), रोहिदास होले (कार्याध्यक्ष), आदेश भोजणे आणि अतुल भालेराव (उपाध्यक्ष), किरण खुडे (सचिव), किशोर गिलबिले (सहसचिव), नाजिम इनामदार (खजिनदार), रोहिदास गाडगे (पत्रकार परिषद समन्वयक), ॲड. निलेश आंधळे (कायदेशीर सल्लागार), सदाशिव आमराळे (प्रसिद्धी प्रमुख), विद्याधर साळवे, दत्ता भालेराव, राजेंद्र लोथे, महेंद्र शिंदे, बाळासाहेब सांडभोर, रामचंद्र सोनवणे, संदीप मिरजे (मार्गदर्शक – सल्लागार)
कार्यकारीणी सदस्य
वनिता कोरे, अशोक कडलक, निवृत्ती नाईकरे, इसाक मुलानी आदी. यावेळी माजी अध्यक्ष दत्ता भालेराव, बाळासाहेब सांडभोर, ज्येष्ठ पत्रकार संजय शेटे, जागर संघटनेचे सुदाम कराळे, ॲड. निलेश आंधळे, अशोक कडलक, सुषमा नेहरकर-शिंदे, ॲड. सोमनाथ नवले, अय्याज तांबोळी, प्रभाकर जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
“खेड तालुक्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या संघाचे अध्यक्षपद सर्व सहकाऱ्यांनी माझ्याकडे सोपवले, त्याबद्दल मी पत्रकारमित्रांचा आभारी आहे. पुढील काळात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविणार आहे”.
– सुनील थिगळे, (नवनिर्वाचित अध्यक्ष)
श्रद्धांजली सभा…
दरम्यान, दिवंगत ज्येष्ठ कीर्तनकार हभप बाबा महाराज सातारकर, मणिलालकाका कडधेकर, ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मश्री प्रभा अत्रे, चित्रपट अभिनेता रवींद्र महाजनी, अभिनेत्री सुलोचना लाटकर, सामाजिक कार्यकर्ते सखाराम ओव्हाळ, बिंदेश्वर पाठक, सीमेवरील शहीद जवान आणि दिवंगत देश बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली.