साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेच्या ज्ञानसत्रास २६ जानेवारीपासून प्रारंभ
व्याख्यानामालेचे हे २१ वे वर्ष; संस्था अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांची माहिती
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात येत्या प्रजासत्ताक दिनापासून (दि. २६) दि. १ फेब्रुवारी दरम्यान साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे होत असलेल्या या व्याख्यानामालेचे हे २१ वे वर्ष असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी दिली.
या व्याख्यानमालेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर प्रेरणादायी विचार ठेवण्यासाठी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ प्रयत्नशील असून तालुक्यातील सर्व नागरिकांनी, आजी – माजी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन व्याख्यानमालेच्या वैचारिक मेजवानीचा, शब्दमहोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, डॉ. एच. एम. जरे उपस्थित होते.
आपल्या वैशिष्टयपूर्ण आयोजनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली ही व्याख्यानमाला सकाळच्या सत्रात होत असून व्यासपीठावर फक्त वक्ता आणि समोर हजारो विद्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती हे या व्याख्यानमालेचे ठळक वैशिष्ट्य असते. महाविद्यालयाच्या प्रांगणात दररोज सकाळी १० ते ११.३० या वेळात ही सर्व व्याख्याने होणार आहेत.
अशी आहेत व्याख्याने
शुक्रवार, २६ जानेवारी – ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे,
विषय – “डॉ. बाबासाहेब आंबेडकर”
शनिवार, २७ जानेवारी – प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक
विषय – “जीवनाचे गाणे होताना”
रविवार, २८ जानेवारी – आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील
विषय – “ग्रामविकास”
सोमवार, २९ जानेवारी – प्रा. वसंत हंकारे
विषय – “बाप समजून घेताना”
मंगळवार, ३० जानेवारी – खासदार डॉ. अमोल कोल्हे
विषय – “छत्रपती शिवाजी महाराज : काल, आज आणि उद्या”
बुधवार, ३१ जानेवारी – संगीत कलाकार आनंद माडगूळकर
विषय – “माझ्या खिडकीतून गदिमा”
१ फेब्रुवारी – प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव
विषय – “गावाकडे चल माझ्या दोस्ता”