श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण; पारगावकर महिलांचा उपक्रम
झाडे लावून जपली श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेची आठवण
पारगाव (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान दिना निमित्त पारगाव तर्फे खेड मध्ये या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन या घटनेची कायम स्वरूपाची आठवण राहावी म्हणून, वृक्षारोपण करण्यात आले. याकार्यक्रमाच्यानिमित्तानं महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत हा अनोखा उपक्रम राबवला.
प्रभु श्रीरामांच्या मुर्ती प्रतिष्टपणादिनानिमित्त गावातून मोठ्या थाटामाटाने प्रभु श्रीरामांची शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेमध्ये ग्रामस्थ आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. या दिवसाची आठवण म्हणून महिला बचत गटांनी एकत्र येत पाच झाडे लावली.
यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे यांनी उपस्थितांना झाडांचे महत्त्व सांगितले. महिलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची शक्ती असते, त्याचा वापर करून जास्तीत जास्त झाडे महिलांमार्फत लावली जावीत असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
सक्षम ग्रुपच्या, प्रियांका मनकर यांनी मनोगत व्यक्त करताना, गावठाणात लावण्यात आलेल्या सहा हजार झाडांबद्दल पर्यावरण जागर प्रतिष्ठान आणि फोर्टीन ट्री संस्था वेताळे यांचे कौतुक केले. या झाडांना आम्ही सर्व महिला भगिनी पोटच्या मुलासारखे जपुन मोठे करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
पारगाव तर्फे खेड गावच्या सरपंच नंदाताई पानसरे यांनी पर्यावरण जागर प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून व फोर्टीन ट्री संस्था वेताळे मार्फत, चालू वर्षात उर्वरित गावठाण क्षेत्रात आणखी दहा हजार झाडे लावणार असल्याचे सांगितले. त्यासाठी दोन तळी करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या सर्व कार्यात गावचे सुपुत्र, राजन जांभळे व फोर्टीन संस्था वेताळे संस्थेचे, अनंत तायडे यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन पानसरे यांनी केले.
यावेळी सरपंच नंदा पानसरे, प्रियांका मनकर, उषा भागडे, आकांक्षा पवार, आरती पवार, लताताई मनकर, विद्या मनकर, सुवर्णा सावंत, सुमन मनकर, प्रभा सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुरेश अभंग, गणेश चिखले, संजय भागडे, मयुर सावंत, ऋत्विक घुले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.