रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा नाणेकरवाडी गावात जल्लोष
गावातील राममंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नाणेकरवाडी (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । आयोध्या येथे राममंदिरामध्ये प्रभु श्री रामचंद्रांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा सोमवारी (दि. २२ ) करण्यात आली. या निमित्ताने संपुर्ण भारतभर गावागावांमध्ये हा दिवस सातरा करण्यात आला. गावागावांमध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत प्रतिष्ठापणादिन साजरा करण्यात आला. याच निमित्ताने खेड तालुक्यातील नाणेकरवाडी गावातील राममंदिरातही दिवसभर वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आले होते. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट यानिमित्ताने करण्यात आली होती.
नाणेकरवाडी गावच्या हरिओम मित्रमंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडला. अगदी पहाटेपासून राममंदिरामध्ये कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची रूपरेषा
सोमवारी सकाळी पहाटे चार वाजता काकड आरतीच्या मंगलमय वातवरणात दिवसाची सुरूवात झाली. सकाळी सात वाजता मंदिरामध्ये होमहवन करण्यात आले. दुपारी साडेबाराच्या सुमारास प्रभु श्रीरामांची आरती करण्यात आली. त्यानंतर रामजन्मभुमी आयोध्या येथुन आलेल्या अक्षता वाटण्यात आल्या. या अक्षता प्रभु श्रीरामांच्या चरणावर अर्पण करण्यात आल्या. दुपारी एक ते तीन भाविकासांठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंदिरामध्ये संगीत आणि भजनाचा कार्यक्रम पार पडला. रात्री आठ वाजता संपुर्ण गावातून प्रभु श्रीरामांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती.
नाणेकरवाडी गावातील तरूण, वयोवृद्ध, महिला आणि लहान मोठ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोध्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद गावक-यांनी साजरा केला.