मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
आंबोली गावच्या परिसरातील १९५७ रूग्णांनी घेतले उपचार
आंबोली (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आणि पुणे जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आंबोली येथे रविवारी (दि. २१) विनामूल्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून विविध आजार व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
या शिबिराला लोकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने असेच शिबिर येत्या बुधवारी (दि. २४) डेहणे (ता. खेड) या गावात आणि मंगळवारी (दि. ३०) वाफगाव (ता. खेड) या ठिकाणी अयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मी सेवेकरी सोशल फउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ मुंगसे यांनी दिली.
शिबिराचे उद्घाटन मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ मुगंसे, सुदामराव शिंदे, विजय खंडागळे, सुधीर शिंदे, प्रविण वायकर, कैलास शिंदे, कचरूशेठ शिंदे, सुनिल काळोखे, विठ्ठल राजगुरव, अक्षय शिंदे, अमोल शिंदे, आंबोली गावच्या सरपंच तृप्ती शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी मंडळ तसेच खेड तालुका वैद्यकिय अधिकारी इंदिरा पारखे, डॉ. चिखलीकर, डॉ. प्रिती पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या शिबिराला, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खेड तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, चास गावचे सरपंच अनिल टोके, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे, चिंबळी गावचे माजी सरपंच शंकर जैद आदि मान्यवर उपस्थित राहिले.
या महाशिबिरामध्ये लोकमान्य हॉस्पिटल, राजमाता जिजाऊ हॉस्पिटल, हिंद लॅब, अग्रवाल आय हॉस्पिटल, H.V. देसाई नेत्र रूग्णालय आदि हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये रक्त-लघवी, ब्लड प्रेशर, शुगर, ECG इत्यादी तपासणी करण्यात आल्या. ह्रदयविकार, त्वचारोग, पंचकर्म, स्त्रिरोग निदान, कान, नाक, घसा, मुत्ररोग, हाडांचे आजार, अशा आजारांवर उपचार करण्यात आले. त्याचबरोबर रूग्णांना मोफत चष्मेवाटपही या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले. या महाशिबरिामध्ये आंबोली गावच्या परिसरातील १९५७ रूग्णांनी सहभागी होत उपचार घेतले.
“या शिबिराला नागरिकांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहून मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम किती महत्वपूर्ण आहे, याची अनुभूती आली त्यामुळे शिबिरात सहभागी झालेल्या जेष्ठ माता पिता, वडीलधारी मंडळींनी केलेले कौतुक आणि दिलेल्या शुभेच्छा मला पुढील वाटचालीसाठी नक्कीच बळ देणाऱ्या ठरणार आहेत”.
– सुधीरभाऊ मुंगसे (संस्थापक अध्यक्ष, मी सेवेकरी सोशल फाउंडेशन.)