जाणीव जागृती मंच राजगुरुनगर आणि खेड तालुका कृषी विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली
राजगुरुनगर (खेड, पुणे) । सह्याद्री लाइव्ह ।
जाणीव जागृती मंच राजगुरुनगर आणि खेड तालुका कृषी विभाग यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. चांडोली येथील फळरोप वाटिका सभागृह येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रतीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. २६ -११ -२००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी, पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी सिद्धार्थ चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार विजेते जी. र. शिंदे, सेवानिवृत्त प्राचार्य लक्ष्मण वाळूंज, अॅड. अनिल राक्षे, प्रकाश पवार इत्यादी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी जाणीव जागृती मंचाचे उपाध्यक्ष सुनील मांजरे, खजिनदार काळुराम सांडभोर, संचालक कैलास मेदगे, इतर सभासद तसेच तालुका व उपविभागीय कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जाणीव जागृती मंचाचे अध्यक्ष विठ्ठलराव भोर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सचिव मुरलीधर थिगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्याचबरोबर संविधानाची निर्मिती आणि त्याचे महत्व सांगितले. मंचाचे संचालक बाळासाहेब गवारी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्वांना संविधानाची शपथ दिली. मंचाचे सहसचिव सतीश चांभारे यांनी आभार मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES