रोटरी क्लबच्या वतीने राजगुरुनगरमध्ये मोफत कर्करोग निदान शिबीर
३५ रूग्णांनी घेतला मोफत लाभ
राजगुरुनगर (खेड, पुणे) । सह्याद्री लाइव्ह । रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो, रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर, महाराष्ट्र आरोग्य मंडळ हडपसर व मुंबई माता बालसंगोपन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “अनुबंध” उपक्रमांतर्गत शनिवारी (दि.२८) मुंबई माता बालसंगोपन केंद्र येथे मोफत कर्करोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात एकूण ३५ लाभार्थ्यांनी सहभागी होऊन लाभ घेतला, पैकी ५ रुग्णांना प्राथमिक स्तरावर रोग निदान झाल्यामुळे त्यांना वेळीचं पुढील उपचार करणे शक्य होणार आहे.
या शिबीरासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोच्या विद्यमान अध्यक्षा रो.सुरेखा देशपांडें, प्रकल्प निमंत्रक रो.मकरंद फडके, रो. विवेक कुलकर्णी, माधवी कुलकर्णी, रो. मुकुंद चिपळूणकर, मुग्धा चिपळूणकर, रो. निलकंठ जोशी, शुभदा जोशी या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष रो. ॲड. दत्ता रुके, माजी अध्यक्षा रो. जयश्री पडवळ यांचे रो. राजेंद्र बोऱ्हाडे, रो. डॉ. कुणाल तांबे, रो. डॉ. अमित ओसवाल, रो. डॉ. आशिष गुजराथी, रो. जितेंद्र गुजराथी, रो. विठ्ठल सांडभोर, रोट्रक्ट क्लबचे संकेत खळदकर व वैभव वाघमारे यांनी सहकार्य केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे माजी अध्यक्ष रो. मुकंद चिपळूणकर यांनी शिबीराविषयी माहिती देताना सांगितले की, ग्रामीण भागात कर्करोगा विषयी अनेक गैरसमज आहेत. लोक तपासणी करून घेण्यास टाळाटाळ करतात. मुंबई माता बाल संगोपन केंद्राच्या सर्व स्टाफने गावोगावी जाऊन शिबीराविषयी माहिती दिली, जनजागृती केली. नागरीकांनी न घाबरता पुढे येऊन वेळीच आवश्यक तपासण्या करून घेतल्यास व वेळेत उपचार घेतल्यास कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन अध्यक्ष रो.दत्ता रुके यांनी केले.
मुंबई माता बालसंगोपन केंद्राच्या समन्वयक शर्मिला सांडभोर, मनिषा सुर्वे तसेच स्वाती शिंदे व केंद्राच्या सर्व नर्सिंग स्टाफचे व व्हेलोसिटी लाईफ स्कॅनरचे डॉ. सुरेश ब्रम्हे व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. मनिषा सुर्वे यांनी आभार मानले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES