‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि.२७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या सोशल मीडियावरील पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR
ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR
सध्या राज्य शासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने भाषा सल्लागार समितीमार्फत मराठी भाषा अभिवृद्धीसाठी केले जात असलेले प्रयत्न, मराठी भाषेचे धोरण, भाषा सल्लागार समितीची भूमिका, सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य, नवीन परिभाषा कोशांची निर्मिती याबाबत सविस्तर माहिती श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.