स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेडच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर जयश्री पावडे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, कौशल्य विकासचे सहायक संचालक रेणुका तम्मलवार आदी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यात एकुण 32 नामांकित कंपन्यांमध्ये एकुण 3 हजार 550 रिक्त पदांची ऑनलाईन भरती होणार असल्याची माहिती रेणुका तम्मलवार यांनी दिली. दिनांक 26 ते 29 जानेवारी असे तीन दिवस ऑनलाईन रोजगार मेळावा सुरू राहणार आहे.